आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे. भारतात 70% लोक शेती हा व्यवसाय करतात. शेती व्यवसाय करताना शेतकऱ्यांना अनेक संकटाना सामोरे जावे लागते, त्यामुळे सरकार शेतकऱ्याच्या हितासाठी विविध योजना राबवत असते. त्याच प्रमाणे शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी सरकारने farmer id card ही नवीन संकल्पना अंमलात आणला आहे.
फार्मर आयडी कार्ड म्हणजे काय?
फार्मर आयडी कार्ड हे शेतकऱ्यांसाठी एक ओळखपत्र आहे, जे सरकारकडून शेतकऱ्यांना दिले जाते. याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध सरकारी योजना, सबसिडी, अनुदाने आणि इतर सुविधांचा लाभ घेता येतो. या मुळे शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ घेणे अधिक सोईस्कर होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणीवर मात होणार आहे.
फायदे
- सरकारी योजना व अनुदान
विविध कृषी योजनेत सबसिडी आणि अनुदान मिळवण्यासाठी आवश्यक. - कर्जसवलत:
शेतकऱ्यांना कमी व्याजदराने पीक कर्ज मिळते. - विमा संरक्षण:
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेता येतो. - खत व बियाणे सवलत:
सरकारी दुकानांमधून अनुदानित दरात खत व बियाणे खरेदी करता येतात. - बाजार सुविधांचा लाभ:
शेतमालाच्या विक्रीसाठी सरकारी बाजारपेठेत विशेष सवलती मिळतात.
फार्मर आयडी कार्ड कसे काढायचे?
पाहा सविस्तर व्हिडिओ 👇👇
ऑनलाइन प्रक्रिया
- महाऍग्री वेबसाईट किंवा संबंधित राज्याच्या कृषी विभागाच्या वेबसाइटवर जा.
- “शेतकरी नोंदणी” किंवा “फार्मर आयडी कार्ड” यावर क्लिक करा.
- अर्ज फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- सबमिट केल्यानंतर अर्जाची स्थिती तपासा.
ऑफलाइन प्रक्रिया
- तालुका कृषी अधिकारी किंवा जवळच्या कृषी सेवा केंद्राला भेट द्या.
- अर्ज फॉर्म भरा व आवश्यक कागदपत्रे जमा करा.
- कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर कार्ड जारी केले जाते.
फार्मर आयडी कार्ड आवश्यक का आहे?
फार्मर आयडी कार्ड शेतकऱ्यांची ओळख पटवण्यासाठी आणि सरकारी योजना व अनुदानांचा लाभ मिळवण्यासाठी अत्यावश्यक आहे. त्याचे विविध उपयोग खालीलप्रमाणे आहेत:
१. सरकारी योजनांचा लाभ
शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, मृदा आरोग्य कार्ड योजना यांसारख्या विविध योजनांमध्ये लाभ मिळतो.
२. अनुदान
बी-बियाणे, खते आणि कृषी यंत्रणा खरेदीवर अनुदान मिळवण्यासाठी आवश्यक आहे.
३. पीक कर्ज सवलत
कमी व्याजदराने पीक कर्ज मिळण्यासाठी आणि बँकिंग प्रक्रियेत सुलभता मिळवण्यासाठी आयडी आवश्यक असते.
४. विमा संरक्षण
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी कार्ड असणे अनिवार्य आहे.
५. कृषी बाजारपेठेतील सुविधा
शेतमाल थेट बाजारात विक्री करताना सरकारी हमी भाव (MSP) मिळवण्यासाठी आयडी आवश्यक असतो.
६. प्रशिक्षण व मार्गदर्शन
शेतकऱ्यांसाठी होणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रम, कृषी तंत्रज्ञान कार्यशाळा यामध्ये सहभागी होण्यासाठी आयडी आवश्यक आहे.
७. इतर शासकीय लाभ
जलसंधारण, सिंचन प्रकल्प आणि जमिनीच्या सुधारणांसाठी मिळणाऱ्या शासकीय अनुदानाचा लाभ घेण्यासाठी.
महत्त्व
फार्मर आयडी कार्ड हे शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी अधिकृत ओळखपत्र म्हणून महत्त्वाचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ते त्वरित काढून घ्यावे.
आवश्यक कागदपत्रे
- ओळखपत्र: आधार कार्ड किंवा मतदान कार्ड
- शेतजमिनीचे दस्तऐवज: सातबारा उतारा किंवा जमीन पटीचा दाखला
- फोटो: पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो
- बँक खाते पासबुक: खाते क्रमांक व IFSC कोड असलेला पृष्ठ
- विजेचा बिल किंवा पत्त्याचा पुरावा
महत्त्वाची टीप
- सर्व माहिती अचूक भरा.
- कागदपत्रे पूर्ण असल्यास अर्ज प्रक्रिया जलद होते.
- अर्जाचा स्टेटस नियमित तपासा.