फार्मर आयडी डाउनलोड करा: अर्जाची संपूर्ण माहिती
शेतकऱ्यांसाठी आता स्वतंत्र डिजिटल ओळखपत्र (फार्मर आयडी) उपलब्ध होणार आहे. जसे नागरिकांसाठी आधार कार्ड आहे, तसेच शेतकऱ्यांसाठी हे ओळखपत्र दिले जाणार आहे.
फार्मर आयडी म्हणजे काय?
केंद्र सरकारच्या ॲग्रीस्टॅक उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना फार्मर आयडी दिले जाईल. या माध्यमातून शेतकऱ्यांची सर्व माहिती एका ठिकाणी साठवली जाईल. त्यामुळे भविष्यात वेगवेगळ्या योजनांसाठी कागदपत्रांची गरज भासणार नाही.
फार्मर आयडी कसे डाऊनलोड करावे, पहा सविस्तर व्हिडिओ 👇👇
कोणाला मिळेल फार्मर आयडी?
- ज्या शेतकऱ्यांकडे जमीन आहे आणि नाव सातबारा उताऱ्यावर आहे.
- शेतकरी हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.
- फक्त पात्र शेतकरी ॲग्रीस्टॅक उपक्रमांतर्गत ऑनलाईन अर्ज करू शकतील.
फार्मर आयडीचे फायदे
- शेतकऱ्यांना डिजिटल ओळख मिळेल.
- शेतीविषयक माहिती एका ठिकाणी साठवली जाईल.
- योजनांसाठी अर्ज करणे सोपे होईल.
- कागदपत्रांची पूर्तता कमी होईल.
फार्मर आयडीसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करावी?
- तुमच्या संगणकावरील ब्राउझर उघडा.
- https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/ या संकेतस्थळावर जा.
- पोर्टल उघडल्यावर CSC (कॉमन सर्व्हिस सेंटर) आयडीद्वारे लॉगिन करा.
- नोंदणी पूर्ण करा.
टीप: सध्या शेतकरी स्वतः नोंदणी करू शकत नाहीत, परंतु लवकरच तो पर्याय उपलब्ध होईल.
नोंदणी केलेले कार्ड कसे डाउनलोड कराल?
नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला कार्ड डाउनलोड करण्याचा पर्याय पोर्टलवर दिसेल.
जर तुम्ही अद्याप फार्मर आयडीसाठी नोंदणी केली नसेल, तर आजच नोंदणी करा आणि शासकीय योजनांचा लाभ घ्या.